इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
बावडा गावातील व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आणि सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा आज दिनांक २६ डिसेंबर २०२० रोजी अभिष्टचिंतन दिन असून त्यांना इंदापूर तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक इत्यादी स्वरूपातील कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.
अंकिता पाटील यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रथम एस . बी. पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा झाल्या त्यानंतर ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन च्या कायदेशीर उपसमितीच्या सह अध्यक्ष व इंडियन शुगर कार्पोरेशन लिमिटेड च्या संचालिका म्हणून त्यांची निवड झाली. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अंकिता पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बावडा लाखेवाडी गटातून पुणे जिल्हा परिषद सदस्या म्हणून पोटनिवडणुकीत २०,७३७ झालेल्या मतदानापैकी १७,२७४ मतांनी विजयी झाल्या. यातूनच त्यांनी इंदापूर तालुक्यातील राजकीय कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांचे कार्य व कार्य पद्धत ही अभ्यासू आणि जनतेच्या विकास कामांना आणि समस्यांना योग्य रित्या दिशा देणाऱ्या ठरत असल्याची चर्चा जनतेतून होत असल्याची दिसून येत आहे.
त्यांनी प्रथमच कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष जनतेच्या अडीअडचणी मध्ये विशेष प्रयत्न द्वारे मदतीचा आधार देण्याचे वेगवेगळ्या स्वरूपातील माध्यमाद्वारे त्यांनी त्यांचे कार्य करून दाखवले. तसेच जिल्हा परिषद पुणे याठिकाणी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांचा व योजनांचा जनतेला जास्तीत जास्त फायदा व्हावा व त्यांचे प्रश्न सोडवले जावेत यासाठी त्यांनी covid-19 या काळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी ,गट विकास अधिकारी व बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच ग्रामसेवक यांचे ऑनलाइन चर्चा घडवून आणून विविध प्रश्नावर कामकाज केल्याचे ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून घडले गेले .अशा दूरदृष्टी अभ्यासू नेतृत्वाचा अभिष्टचिंतन दिवस हा प्रगतीचा दिवस म्हणून त्यांच्या चाहत्यांकडून स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. अंकिता पाटील यांचे कार्य साखर कारखाना संदर्भातील विविध स्तरातील निर्णयासंदर्भात अभ्यासात्मक प्रश्न व धोरणे इत्यादीवर चर्चा बैठक त्यांच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आले. ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन च्या कायदेशीर उपसमितीच्या सह अध्यक्ष म्हणून काम करीत असताना ऑनलाईन व वार्षिक सर्वसाधारण सभा केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अंकिता ताई यांच्या माध्यमातून पार पडली. यातून अभ्यासात्मक कार्याचा ठसा संपूर्ण देशात दिसून आला .अशा कार्यकुशल कृतिशील अभ्यासू नेतृत्व यांचा अभिष्टचिंतन म्हणजे विकास शील नेतृत्वाचा गौरव दिवस होय.
अंकिता पाटील यांच्या अभिष्टचिंतना निमित्त इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्षारोपण कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम म्हणून ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप व अनाथ आश्रम या ठिकाणातील मुलांना फळे व मिठाई वाटप इत्यादी स्वरूपातील सामाजिक उपक्रम त्यांच्या असंख्य चाहत्या कडून कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवले असल्याचे दिसून आले. त्यांना शिवछावा मावळा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिष्टचिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा.

