इंदापूर प्रतिनीधी:बेडशिंगे (ता. इंदापूर, पुणे) येथे (दि.२३) रोजी माजी सहकार व संसंदिय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य हर्षवर्धनजी पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य कु. अंकिता पाटील यांच्या अभिष्टचिंतन दिना निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अभिष्टचिंतन दिनानिमित्त वृक्षारोपणाच्या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील म्हणाल्या की, अमोलराजे इंगळे मित्रपरिवार व युवा उद्योजक म्हणून आपल्या उद्योग व्यवसाय मार्फत जे काम करतात त्याप्रमाणे सामाजिक ,राजकीय, कला , शैक्षणिक , सांस्कृतिक क्षेत्रात इंदापूर तालुक्यांमध्ये युवकांनी सामाजिक बांधिलकी समजून काम करावे.
लाँकडाऊ काळात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर , नर्स, अंगणवाडी सेविका, आशाताई सेविका यांना मदत, पोलीस अधिकाऱ्यांना भोजन अशी अनेक सामाजिक काम व स्वतःच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त ऊसतोड मजुरांच्या मुलांना स्वेटर वाटप, रक्तदान शिबिर अनेक ठिकाणी वृक्षारोपण , गोरगरीब जनतेच्या मुलांना वह्या, पुस्तके वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. युवकांना एक प्रेरणादायी अमोलराजे मित्रपरिवार यांचे काम आहे .
आपल्या उद्योग-व्यवसायातील काही वाटा समाजाच्या उपयोगासाठी करावा. प्राथमिक शाळेत आसणाय्रा गोरगरीब जनतेच्या मुलांना किंवा विद्यार्थी असतील त्यांना मदत करावी. सामाजिक काम, रक्तदान, वृक्षारोपण असेल अशा अनेक कामात आर्थिक मदत किंवा वह्या, पुस्तके किंवा शैक्षणिक वस्तूच्या रूपाने काम करून समाजील मानवतेची सेवा करणे म्हणजेच ईश्वर सेवा आहे.
इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत उपक्रम राबवले जात आहेत. वृक्षारोपण, आश्रमशाळेतील मुलांना खाऊ वाटप असेल रक्तदान शिबिर अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम सध्या माझ्या अभिष्टचिंतनम राबवले जात आहेत याचा खरा आनंद मला आहे .
या कार्यक्रमाप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता पाटील यांचे सुरवातीला महिला भगिनी यांनी औक्षण करुन ओवाळणी केली .
या वेळी इंदुमती विकास सेवा सोसायटी चेअरमन दिलीप बन, देवीदास गिरी सर, बेडशिंगेचे पोलीस पाटील पांडुरंग गिरी, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम उंबरे, श्रेयस नलवडे, हरिभाऊ जाधव,राहूल इंगळे, नितिन यादव, युवराज बन सर, नारायण आसबे, किरण सरडे, व ग्रामस्थ महिला माता भगिनी उपस्थित होते.
आयोजन अमोलराजे इंगळे मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ बेडशिंगे यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजिन केले होते. सूत्रसंचालन विलासराव दोलतडे यांनी केले व आभार अमोलराजे इंगळे यांनी व्यक्त केले.

