shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर युवा काँग्रेस चा इशारा ..पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे १०, दिवसात बुजले नाही तर टोल बंद आंदोलन करू...!!


संगमनेर । प्रतिनिधी ( ऋषिकेश जगताप): 
संगमनेर मधून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गवर असलेले खड्डे १०,  दिवसात बुजवावे अन्यथा टोल बंद आंदोलन केले जाईल. 
असा इशारा युवक काँग्रेसचे पद अधिकारी व NSUI , च्या पदाधिकाऱ्यांनी दिला. महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे , यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर युवा काँग्रेस व NSUI च्या वतीने दिनांक २९-१२-२०२० ला टोल बंद आंदोलनाचा इशारा दिला. हिवरगाव पावसा येथील टोल कंपनी ILFS, यांना टोल बंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी युवा काँग्रेसचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्री , सुभाषराव सांगळे, युवा काँग्रेसचे पदाधिकारी, सोमेश्वर दिवटे, जिल्हा परिषद अध्यक्ष, अजय फटांगडे, NSUI, चे अध्यक्ष ,गौरव डोंगरे, यांच्यासह पदाधिकारी व युवा काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक-पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने टोल बंद आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
close