shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शनैश्वर देवस्थान विश्वस्त पदासाठी विक्रमी ८४ अर्ज दाखल..! विद्यमान अध्यक्षांसह ३ माजी अध्यक्ष रिंगणात..!!

प्रतिनिधी। मोहन शेगर
 सोनई :-शनैश्वर देवस्थान विश्वस्थ पदाकरिता ११ जागेंसाठी तब्बल ८४ अर्ज दाखल केले आहेत. या मध्ये विद्यमान अध्यक्षांसह ३ माजी अध्यक्ष यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने ११ महिला आहे. सन २०१८ मध्ये तत्कालीन फडणवीससरकारने विश्वस्त मंडळ बरखास्त करुन शासनाच्या नियंत्रनाखाली आणण्यासाठी शनिशिंगणापुर परंपरागत घटना रद्द करुन नविन विधेयक तयार करुन विशीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूरही केले त्यास राज्यपालाची मंजूरी मिळाली. 

मात्रएवढे होवुनही देवस्थान शासनाच्या नियंत्रणात येऊशकले नाही. दरम्यान रज्यात विधानसभेच्या निवडणुका होवुन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा २०२१-२०२५ या पंचवार्षीक निवडीचा कार्यक्रम नगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जाहिर करुन शनिशिंगणापुर येथील मुळ रहिवाशी असलेल्यांनीच अर्ज करावे, अशी नोटीस प्रसिद्ध केल्यावरुन गावातीलमुळ रहीवासी असलेले शेटे आडनावाचे २६ अर्ज, दरंदले आडनावाचे १९, बानकर १९ तर कुर्‍हाट आडनावाचे ९ व इतर आडनावाचे ११ अर्ज दाखल झाले आहेत, विश्वस्त पदासाठी अर्ज करताना ती व्यक्ती शिंगणापुर मधील मुळ रहीवासी असल्याची अट घातली असून यात माजी अध्यक्ष डॉ.रावसाहेब बानकर, दादासाहेब दरंदले, सोपान बानकर, १७ आजी माजी विश्वस्थांचे अर्ज दाखल झालेले आहेत.

विश्वस्थ पदासाठी फिल्डींग लावण्यासाठी प्रत्येक अर्जदाराची लगबग सुरु आहे. २१,२२ व २३ डिसेंबरला अर्जदारांच्या अहमदनगर धर्मदाय आयुक्त कार्यालयात मुलाखती होवुन यातुन नविन वर्षात ११ विश्वस्थांची निवड केली जाणार आहे. शनिशिंगणापुर गावात बानकर,दरंदले, शेटे आडनावाचे अधिक कुटुंब आहेत व ते सर्व एकमेकांचे पाहुणे आहेत. तसेच विश्वस्थ मंडळात वरील आडनावाच्या अधिक पगडा असतो. 

अर्ज भरणारे सर्वच उमेद्वार एकमेकांचे पाहुणे आहेत. आलेल्या ८४ अर्जामधून ११ जणांची निवड केली जाणार आहे त्यामुळे जोतो आपापल्या परीने फिल्डींग लावत आहे. यात शनिदेव कोणाला कौल देतो पहावे लागेल.
close