shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केजमध्ये लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद..!!

सामाजिक कार्यातून साहेबांचा वसा आणी वारसा पंकजाताई मुंडे सक्षमपणे चालवतात-अक्षय मुंदडा...

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :-
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन लोकनेत्या पंकजाताई मुंडे व जिल्याच्या लोकप्रिय खा.डॉ प्रितमताई मुंडे यांनी केल्यानंतर केज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी दु.११ वा.केज उपजिल्हा रूग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.साहेबांचा वसा आणी वारसा पंकजाताई मुंडे सक्षमपणे चालवत असल्याने प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी यावेळी केले.

लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने केज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी दु.११वा.उपजिल्हा रूग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते तर विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे,जि.प.सदस्य योगिनिताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.रक्तदान शिबिरास भाजपाचे जेष्ठ नेते नंदकीशोर मुंदडा,सारंग पुजारी,नारायण हांगे,रहिमभाई यांनी सदिच्छ भेट दिली प्रसंगी वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ.वसुदेवराव नेहरकर,तालुकाध्यक्ष भगवान केदार,सभापती विष्णू घुले,मुरलीधर ढाकणे,दत्ता धस,सुरेंद्र तपसे,नेताजी शिंदे,सुदाम पाटील,अशोकराव मोराळे,अगद भाऊ मुळे,शरद इंगळे,बंडु शिंदे,सुनील घोळवे,महादेव सुर्यवंशी,लाला शिंदे,अतुल इंगळे,अविनाश साबळे,बिभिषन भोसले,सुरेश नांदे,लिंबराज पारके,बाबुराव घुले,महादेव जाधवर,सुरेश केकान यांच्यासह केज तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रक्तदान शिबिराचे उत्कृष्ट नियोजन वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ.वसुदेवराव नेहरकर,तालुकाध्यक्ष भगवानराव केदार,सभापती विष्णू घुले यांनी केले होते.
close