shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माणगाव येथील बाबाजी लक्ष्मण धोत्रे हे आंतरराष्ट्रिय पुरस्काराने सन्मानित. ..!!

माणगाव । प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपरिषद मधील हॉलमध्ये वर्ल्ड पार्लमेन्ट या सामाजिक संघटनेच्या वतीने पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वर्ल्ड पार्लमेन्ट या सामाजिक संघटनेच्या वतीने दर वर्षी उल्लेखनीय व वैशिष्ट्य पुर्ण कामगिरी केलेल्या फक्त पन्नास व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतात.

यावेळी बाबाजी लक्ष्मण धोत्रे यांना सन्मानचिन्ह,माणपञ वर्ल्ड पार्लमेन्ट इंटरनॅशनल अवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. बाबाजी धोञे हे रायगड जिल्हा परिषद शाळा, तळा शेत येथे उपशिक्षक असून त्यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल वरिल  पुरस्कार  र्ल्ड  पार्लमेंट असोसिएशन (WCPA) तर्फे मा.डाॅ.दत्ता विघावे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पन्नास जणांची निवड या सामाजिक संघटनेच्या वतीने  करण्यात येते.

कोरोना कालावधीतील  कविता,शैक्षणिक काम तसेच कोड या विकारावर उपचारार्थ  केलेल्या  संशोधनात आलेल्या यशामुळे हा पुरस्कार धोञे यांना देण्यात आला
.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.शिवाजीराव ढवळे राज्यमंत्री दर्जा;श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा अनुराधाताई आदिक;संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष मा.प्रकाश कुलथे; प्रांताधिकारी अनिल पवार; तहसीलदार प्रशांत पाटील, राष्ट्रीय कवी डाॅ. खंडू माळवे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम संपन्न झाला. सुञसंचलन आदिनाथ जोशी यांनी केले तर आभार डाॅ.दत्ता विघावे यांनी  मानले.
close