इंदापूर तालुक्यात आगळ्यावेगळ्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या चर्चा..
इंदापूर प्रतिनीधी : तात्याराम पवार
दि. ५ इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथील युवा उद्योजक, प्रगतशील बागायतदार, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष , भारतीय जनता पार्टीचे युवानेते अमोलराजे इंगळे यांनी आपला अभिष्टचिंतन दिन ऊसतोड मजुर व त्यांच्या मुलांसोबत साजरा केला .
त्यांच्या मुलांना स्वेटर वाटप करून त्यांच्या सोबत दिवाळी भोजन करून आनंद घेतला. युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांचा अभिष्टचिंतन दिन बारामती, माळशिरस, इंदापूर, करमाळा तालुक्यातील अनेक युवक मोठ्या प्रमाणात अभिष्टचिंतन दिन साजरा करत असतात.
कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, अनेक क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव होत असतो. गेली अनेक वर्ष आपला अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत आसतात. यामध्ये रक्तदान शिबिर, गरिबांच्या मुलांना वह्या, पुस्तक वाटप, वृक्षारोपण , कोरोना लॉकडाऊन मध्ये अनेक गरजू लोकांना अन्नदान, रुग्णांना फळे वाटप असे अनेक सामाजिक कार्यक्रम ते साजरे करत असतात.
यावर्षी अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम राबवत ऊसतोड मजुरांच्या लहान मुलांना स्वेटर वाटप करून त्यांच्यासोबत मिळून मिसळून त्यांच्यासोबत गोडधोड खाऊन हा अभिष्टचिंतन दिन साजरा केला. हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करत असताना इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया चे अनेक पत्रकार उपस्थित होते.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना युवा उद्योजक अमोलराजे इंगळे म्हणाले कि, साधुसंत यांची शिकवण व ग्रंथ यांच्या आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आचार डोळ्यांसमोर ठेवून, आचरणात आणून गोरगरीब जनतेमध्ये मिळून मिसळून श्रीमंत-गरीब असा दुजाभाव न करता मानवता , समता , बंधूता आपल्याला समाजात रुजवायची असेल किंवा थोर महापुरुषांचे विचार आचरणात आणायचे असेल तर ज्यांच्याकडे ओंजळ भरल्याली आहे अशांनी ओंजळीतून खाली सांडून मातीमोल होण्यापेक्षा आपल्या ओंजळीतील काहीतर गोरगरीब युवकांना बालकांना त्याचा फायदा होईल त्यांच्या संसाराला ,त्यांच्या जीवनात , शिक्षणाला हातभार लागेल अशा पद्धतीने अभिष्टचिंतन दिन सामाजिक उपक्रम , समाजोपयोगी साजरे करावेत आणि अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने मी ही आपला अभिष्टचिंतन गोरगरीब नागरिकांच्या मध्ये त्यांच्या परिवारासोबत मिळून-मिसळून करणार आहे असे त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यावेळी अखिल भारतीय परिषद पत्रकार संघटनेचे इंदापूर तालुका सचिव , अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष व संपादक धनंजय कळमकर, आधार न्यूजचे जितेंद्र जाधव, बारामती प्राईड व मानदेश न्यूज इम्तिहाज मुलाणी , ग्रामीण महाराष्ट्र न्यूजचे दीपक खिलारे , शिर्डी एक्सप्रेसचे तात्याराम पवार , आपला महाराष्ट्र न्युज, श्रेयस नलवडे,. इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया इंदापूर तालुका प्रतिनिधी, पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष, ह्यूमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हाध्यक्ष, पत्रकार कैलास पवार अनेक पत्रकार मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते .
अखिल भारतीय पत्रकार परिषद संघटना इंदापूर, अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती इंदापूर, श्रमिक पत्रकार संघ इंदापूर , पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य , विश्व वारकरी सेना ,व विविध संघटना सामाजिक ,राजकीय पदाधिकारी पासून अभिष्टचिंतन दिनानिमित्त अभिनंदन शुभेच्छा वर्षाव होत होता..

