(भाजपाचे सेनगांव तालुका उपाध्यक्ष गणेशराव जारे यांचा राजीनामा)
हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.११,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव नगरपंचायत निवडणुकीचे नुकतेच प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असुन लवकरच निवडणुक रणधुमाळीला सुरुवात होणार असुन भाजपाचे उप तालुकाध्यक्ष गणेशराव जारे यांनी दि.११ डिसेंबर शुक्रवार रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने निवडणुकी आधीच भाजपाला जोरदार धक्का बसल्याने भाजप गोटात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या तिस वर्षापासून गणेशराव जारे हे भाजप मध्ये निष्ठेने कार्य करीत असुन सामाजिक कार्य व भाजप पक्षाचे विचार तळागाळातील जनते पर्यंत पोहचविल्याने त्यांची सेनगांव उप तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती.परंतु सेनगांव भाजप पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता उप-या लोकांनाच पक्षात मान दिला जात असल्याने जुन्या भाजप कार्यकर्त्यांना अडगळीत टाकण्याचे काम होत आहे.गेल्या ३० वर्षापासून पक्षाचे निष्ठेने काम करुन देखील विश्वासात न घेता डावलले जात असल्याने गणेशराव जारे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्य पदासह भाजप सेनगांव तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा आज दि.११ डिसेंबर शुक्रवार रोजी सेनगांव भाजप तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल यांच्याकडे दिल्याने सेनगांव तालुका भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.ऐन सेनगांव नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर जारे यांनी राजीनामा दिल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.
प्रतिक्रीया
मी गेल्या ३० वर्षापासून भाजपमध्ये निष्ठेने कार्य केले असून माझ्या सारख्या जुन्या कार्यकर्त्याना विश्वासात न घेता उप-यांनाच भाजप मध्ये मान दिला जात असल्याने जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असल्याने मी सेनगांव भाजप उप तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
गणेशराव जारे

