shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोकळा पण बोलका कसलाही आचपेच न ठेवता बोलणारा केज शहराचा युवा नेता अतुल इंगळे ..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:-              
अतुल इंगळे हा समोर दि पवारसला की बऱ्याच जणांना वाटत की याला बोलाव का नाही परंतु मनात काहीही न ठेवता तोंडाला येईल ते बोलणारा पण अगदी मोकळ्या मनानी सहज बोलून जाणारा मित्र म्हणजे अतुल इंगळे.  केजचा युवा नेता जे आहे ते जागेवर बोलणारा त्याच्या साठी एकच दैवत ते म्हणजे मा. नंदकिशोर मुंदडा ( काकाजी ) साहेब . अतुल भेटला म्हणजे जे काही दहा पंधरा मिनिटे सोबत आहे तो पर्यंत खळखळून हसायला लागणार हे प्रत्येकाला माहिती असते . अतुलला टाळून जायचा विचार पण कोणी करत नाही


समोर दिसल्या दिसल्या अतुल  काय बोलल याचा नेम नसला तरी पण तो सहजपणे बोलून समोरच्याला दहा पंधरा मिनिटं हसून हसून दमवणार हे नक्कीच. बोलण्याची खुमासदार शैली , गावरान बाज अन अस्सल मराठवाडी डोंगराळ अन शिवराळ बोलण ऐकायचा तो अस्सल खमंग योग म्हणजे अतुल इंगळे.  बरं अतुल  बोलून गेल्यावर सुध्दा कोणाच्याही मनात त्याच्या विषयी फारसा राग निर्माण होतं नाही. कारण ठरवून तो काही बोलतच नाही. सरसकट  ताबडतोब जिथल्या तिथ कोणाला काय वाटल याचा विचार न करता बेधडक बोलणारा अतुल इंगळे अनेकांना काय वाटतो हे माहिती नाही पण प्रत्येकाच्या सोबत मोकळ वागण अन बोलण, कोणालाही न जमणार जिवन अतुल मात्र हसत खेळत सहज बोलून जातो हे अतुलचे वैशिष्ट्य .                                 

अतुल इंगळे यांच्या सोबत मोठा परिवार सुद्धा आहे. वडील संपतराव संभाजी इंगळे, आई कांचन संपतराव इंगळे, काका अंकुशराव इंगळे, बहिण, भाऊ सह इंगळे परिवार  केज शहरात मोठ्या प्रमाणात आहे.                       
अश्या या बिनधास्त , बेधडक , मोकळा , बोलका, काहीही बोलून जाणाऱ्या मनात काहीही वाईट हेतू न ठेवता बोलणाऱ्या केजच्या  अतुल इंगळे यास वाढदिवसाच्या खुप खुप  शुभेच्छा.
close