संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):
शेळकेवाडी च्या नागरिकांनी त्रास सहन न झाल्याने स्वखर्चातून रस्त्याची केले मुरमीकरण. मात्र या मुरमीकरण नंतर लोकप्रतिनिधी राहिले मूखगिळयासारखे गप्प.
घारगाव ते अलकापूर असा हा रोड.. या रोडला ९ ते १० फुटांचे लांब लांब व एक दोन फुट खोल खड्डे पडले होते.त्यामुळे तेथील शेतकरी व नागरीक हैराण झाले होते. हा त्रास होत असताना शेळकेवाडी च्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार केली तरी काम न करता गप्प राहिले. मात्र या ठिकाणी पावसाळा गेला तरी साधा कोणी मुरूम टाकला नाही. त्याच मुळे आता नागरिकांनी आता आपल्या स्वखर्चातून आपल्या खिशातून त्याठिकाणी मुरमीकरणासाठी पैसे जमा करून मुरमीकरणाचे काम सुरू केले आहे .
मात्र एकीकडे पाहिलं तर लोकप्रतिनिधी एवढे कसे गप्प राहू शकतात हा सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.

