shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सतत अन्याय करूनही शेतकऱ्याने कधीही आपल्या समाजाशी आणि राष्ट्राशी गद्दारी केली नाही... समाज भूषण डॉ. लक्ष्मण असबे..!!

इंदापूर प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
बावडा: १५ डिसेंबर २०२०. रोजी समाज भूषण व भारतीय चिकित्सा रत्न डॉक्टर लक्ष्मण असबे यांनी  आज लिहिलेल्या लेखनात वरील विधान करून पुढे म्हणाले की,   आपल्यावर होत असलेला अन्याय माणूस क्षमतेपेक्षा जास्त सहन करू शकत नाही. 


*सहनशीलतेलाही सीमा असते*
आपलीच माणसे ज्यावेळी आपल्याच माणसांवर अन्याय करू लागतात , त्यावेळी 
      या वेदना असह्य असतात .
 आपला शत्रू संधी साधून आपल्यावर वार करणार आहे , अन्याय करणार आहे , ही मानसिकता आपली आपोआप असते . त्यामुळे 
  शत्रूने किंवा परक्याने अन्याय केला 
    तर त्यांना ते अनपेक्षित नसते, त्यामुळे 
ते सहन करण्याची आपली मानसिक असते. 
🌚🌚🌚🌚🌚🌚
 
ज्यांना आपण आपले मानलेले आहे, 
ज्यांच्यासाठी आपण कष्ट घेतलेले आहेत, 
_ती माणसे ज्यावेळी अन्याय करू लागतात त्यावेळी ते सहन करण्याची आपली मानसिक तयारी नसते_. 
*अशावेळी आपल्या शत्रू पेक्षा जास्त राग आपल्याला आपल्या माणसाचा येतो , मग त्या अन्यायाच्या विरोधात आपण बंडखोर बनतो आणि त्याच्यावर मात करण्यासाठी कोणाचीही मदत घेण्यास आपल्याला गैर वाटत नाही .*
     
आज अशीच काहीशी अवस्था 
      शेतकऱ्यांची झालेली आहे .
 _विरोधात असताना शेतकऱ्यांचे कैवारी बनून , शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारी माणसे ज्यावेळी सत्तेच्या खुर्चीत बसतात त्यावेळी शेतकऱ्यांचे इतके कट्टर वैरी कशी बनतात ⁉️ हे एक भारतातील नागरिकांना न उलगडलेले कोडे आहे_ .
 
आज शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीन मदत करतोय असे बेताल वक्तव्य काही जबाबदार नेते करत आहेत. 
त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल तर , 
    ⁉️असे का घडतेय ⁉️
   याचा विचारही त्यांनी करावा .
 _आपणच आपल्या माणसावर सतत अन्याय करू लागलो, तर त्याच्याविरुद्ध बंड करताना शेतकरी कोणाचीही मदत घ्यायला प्रवृत्त होईल, असे आपल्याला वाटत नाही का ⁉️_

  *सतत अन्याय करूनही शेतकऱ्याने कधीही आपल्या समाजाशी आणि राष्ट्राशी गद्दारी केली नाही*. 
भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांनी गद्दारी केलेले एकही उदाहरण सापडणार नाही . नेत्यांनी , उद्योगपतींनी राष्ट्राशी गद्दारी करून परदेशी बँका भरल्याची अनेक उदाहरणे इतिहासातही आहेत आणि वर्तमानातही आहेत . 

*अशा लोकांनी शेतकऱ्यांना गद्दार ठरविणे म्हणजे  पतिव्रतेला वेश्या ठरविण्यासारखे आहे* .
↘️निसर्गाची अनियमितता,
↘️ सरकारी धोरणाची अनिश्चितता, 
↘️व्यापारी , भांडवलदार आणि मजूर 
     यांनी चालू केलेली लूट व
↘️ शेतकऱ्यांचे नेते, लोकनेते म्हणून 
     निवडून गेलेले पुढारी , 
    यांनी केलेली अवहेलना , यामुळे  
  *भारतातील शेतकरी कमालीचा अस्वस्थ आणि अन्यायग्रस्त झालेला आहे*.
 बंड करण्यासाठी सर्वच बाजूंनी त्याला पोषक वातावरण बनलेले आहे . 
अशा स्फोटक परिस्थितीत लोकनेत्यांनी त्यांना आपुलकीने आणि प्रेमाने हाताळले पाहिजे . अन्यथा सहनशीलतेचा अंत होईल आणि *भारतातील शेतकरी हा जो मरणारा बनलेला आहे, तो मारणारा बनायला वेळ लागणार नाही*.
   
   _सर्व मार्ग संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांनी हातात शस्त्र घेतले, तर त्याला जबाबदार शासन आणि प्रशासन दोघेही असणार आहेत_. 
↘️कृषिप्रधान असलेल्या भारत देशात 
    रक्ताच्या नद्या वाहतील .
↘️ महासत्ता होण्याची क्षमता असणारा भारत, आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर केलेल्या अन्यायामुळे रसातळाला जाईल . 
↘️बंड करण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांना कोण्या परक्याच्या मदतीची गरज लागणार नाही .
↘️ त्याच्या अंगात क्रांतिकारकाचे रक्त आहे याचे भान प्रत्येक नेत्याला असायला हवे .

          🕎🕎🕎🕎🕎🕎
    ✒️ *_डॉ.आसबे ल.म._*✒️
   _अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
    🕎🕎🕎🕎🕎🕎
    मो.नं. *9822292713*.
close