shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिद्धीविनायक अर्बन माजलगाव तर्फे आयोजित लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद..!!

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी  .... भाजप नेते रमेश आडसकर..!!

बीड । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित् सिद्धीविनायक अर्बन माजलगाव तर्फे  रक्तदान शिबीराचे आयोजण करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

या प्रसंगी प्रास्ताविक करताना सिद्धीविनायक अर्बनचे अध्यक्ष तथा भाजपा सहकार आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डॉ.प्रशांत पाटील यांनी सुरुवातील साहेबांना अभिवादन करून सांगितले की स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य अपार आहे, सर्व धर्माला सर्व जातीला सोबत घेऊन संघर्ष करत त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भारतीय जनता पक्षात राहून गोरगरीब जनतेसाठी काम केले. व महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री असे खाते अत्यंत यशस्वी पणे सांभाळून आपल्या कामाने संपूर्ण देशात त्यांना मानणारा खुप मोठा वर्ग निर्माण केला आहे. म्हणूनच त्यांच्याकडे केंद्रात केंद्रीय ग्राममविकास मंत्री असे महत्वाचे व मानाचे खाते दिले होते. पण नियतीने त्यांना आपल्यातून खुप लवकर नेले. त्यांच्या आपार अशा कार्याने त्यांनी अनेक कुटुंब उभा केलेली आहेत. आज दि.12 डिसेंबर रोजी त्यांची जयंती आहे. व त्या निमित्तानेच आम्ही सामाजिक कार्य म्हणून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. 


असे म्हणत ते म्हणाले की जब किसिके खूण से बचती है अपणो की जाण तब समज मे आता है क्या होता है रक्तदान.. आणि कालच मा.पंकजाताईंनी पण ट्विट करून जास्तीत जास्त रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे असे सांगून त्यांनी श्रोत्यांना कार्यक्रमा विषयी माहिती दिली.  या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ.भागवतराव कराड साहेब यांनी ही स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला व म्हणाले की मला नगरसेवक, महापौर साहेबांनीच केले व आज मी जो खासदार आहे तो पण मुंडे साहेबांमुळेच आहे. सिद्धीविनायक अर्बनचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांचेही सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करून मी पुढच्या वर्षी ही सिद्धीविनायक अर्बनच्या रक्तदान शिबिरासाठी मी आवर्जून येईल असे ही ते म्हणाले.             

अध्यक्षीय समारोप करताना माजलगाव मतदार संघाचे नेते रमेशराव आडसकर यांनी सांगितले की स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्यफार मोठे आहे व आम्हाला प्रेरणा देणारे आहे, असे सांगून त्यांनी साहेबांना अभिवादन केले व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.                   

यावेळी भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.आ.केशव दादा आंधळे, भारतीय जनता पक्ष केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.प्रकाशराव आनंदगावकर, भाजपा नेते नितीन दादा नाईकनवरे, भारतीय जनता पक्षाचे माजलगाव तालुका अध्यक्ष अरुनराव राऊत भाजपा बीड जिल्हा सचिव बबनराव सोळंके, अमरनाथजी खुर्पे भाजपा नेते ज्ञानेश्वर नाना मेंडके, भाजपा मा. तालुका अध्यक्ष हनुमान कदम, मा.नगराध्यक्ष डॉ.अशोक तिडके, शहर अध्यक्ष अँड. माणिक दळवे मा.उपनगराध्यक्ष दिपकराव मेंडके डॉ.स्वानंद कुलकर्णी, रा.स्व.संघाचे जिल्हा अध्यक्ष डॉ.किशोर रत्नपारखी ईश्वर खुर्पे बळीराम दराडे विजय रांजवन  व माजलगाव पंचक्रोशीतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सिद्धीविनायक अर्बन चे संचालक, सभासद, रा.स्व.संघाचे स्वयंसेवक व सामाजिक कार्य करणारे अनेक लोक उपस्थित होते. रक्तदान शिबिराचा कार्यक्रमास खुप  तरुण, पुरुष व महिलांनी उत्स्फुर्तपणे मोठ्याप्रमाणात रक्तदान केले.. या शिबिराला खा.प्रितम ताई मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धीविनायक अर्बनचे संचालक तथा न प पाणीपुरवठा सभापती विनायक रत्नपारखी यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक तथा भाजपा सोशलमीडिया बीड जिल्हा संयोजक दत्ता महाजन यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धीविनायक अर्बनचे संचालक आनंद कुलकर्णी, भार्गव जोशी, निरंजन वाघमारे, राघवेंद्र शिर्षिकर जगदीश साखरे, कमलाकर देशमुख, कैलास जोशी अनिल गोंडे, रविंद्र पाटील संतोष देशमुख अँड. दिपक देशमुख, संजय देशमुख, ओम देशमुख, प्रवीण पाटील व सिद्धीविनायक अर्बनचे पदाधिकारी तथा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.                             

उपस्थित सर्व रक्तदात्यांचे आभार माजलगाव मतदार संघाचे भाजप नेते रमेश आडसकर साहेब यांनी मानले.
close