इंदापूर प्रतिनिधी:
इंदापूर:१२ डिसें.२०.इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने तालुका राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस पार्टी कडून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी भरणे यांनी स्वतः रक्तदान करुन शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस पार्टी कडून खासदार शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनाचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले..यावेळी बोलत असताना राज्यमंत्री दत्तात्रेय
भरणे म्हणाले की,शरद पवार साहेब हि परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे.
कामगारांचा प्रश्न,ऊसतोड मजुरांचा प्रश्न,ऊस कारखान्यांचा प्रश्न अथवा कोणत्याही क्षेत्रातील प्रश्न असू द्या या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणारे शरद पवारांसारखा नेता या देशाला मिळणार नाही.केंद्रात मंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारी योजना सक्षमपणे राहवल्या आहेत.कधी कधी घरच्या माणसांना आपली आपली किंमत कळत नाही.मात्र बाहेरच्या राज्यात जावून अनुभवाला तेव्हा पवारसाहेब या नावाची किंमत कळेल.मी आजपर्यंत अनेक रक्तदान कार्यक्रमाची उद्घाटने केली मात्र मी कधी रक्तदान केले नव्हते.परंतु आज पहिल्यांदा साहेबांसाठी रक्तदान करुन शुभेच्छा देत आहे.
रक्ताचा खुप मोठा तुटवडा आज राज्यात निर्माण झाला आहे.नुकतेच मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी देखिल रक्तदान करावे याबाबत आपणांस आवाहन केले आहे.मी देखील सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी रक्तदानासारखे महान कार्य करावे.निश्चित तुम्ही दिलेले रक्त कोणा एकाचे प्राण वाचवतील त्यापेक्षा मोठा आनंद नाही.कदाचित पुढील आठ दिवसात रक्ताचा साठा संपणार आहे.त्यामुळे रक्तदान करण्याची आज गरज आहे.असे ते म्हणाले.या कार्यक्रमात शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केले.यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

