shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर च्या पश्चिम भागात ग्रामपंचायत निवडणुकीची चे वातावरण तापले..!!

इंदापूर प्रतिनिधी( तात्याराम पवार)
वालचंदनगर: १३ डिसें.२०.इंदापूर च्या पश्चिम भागात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वालचंदनगर ग्रामपंचायत चे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण झाल्यामुळे   निवडणूक  मध्ये खूप चुरस निर्माण झाली आहे. त्यातच  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वालचंदनगर ग्रामपंचायत निवडणूक मध्ये वैयक्तिक लक्ष घातले आहे .त्यांचा थेट सामना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील याचे  समर्थक मानल्या जाणाऱ्या गायकवाड-मोरे गटाशी होणार आहे.


वालचंदनगर चे सरपंच सौ छाया मोरे यांनी केलेल्या विकास कामांचा थेट फायदा भारतीय जनता पार्टी ला होणार आहे. असा विश्वास कार्यकर्त्यां मध्ये आहे.मागील पाच वर्षात स्थानिक राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी सत्तातरांचे प्रयत्न करूनही अपयश आल्याने राज्य मंत्री स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.मागील विधानसभा निवडणुकीत ग्रामपंचायत ताब्यात नसल्या मुळे त्यांना हवे असे लीड मिळाले नाही .वालचंदनगर ग्रामपंचायत महत्वाची आहे. कारण त्याचा थेट परिणाम  इंदापूर तालुक्यावर्ती होतो. आता ची परिस्थिती पाहता मोरे - गायकवाड गट व राष्ट्रवादी मध्ये सामना रंगणार असे दिसते.राज्यमंत्री विरूद्ध भाजप हा सामना खूप रंगणार हे निश्चित.वालचंदनगर  ग्रामपंचायत वरती भाजप ची सत्ता येणार असे  भाजप चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील व अर्बन बँकेचे संचालक सत्यशील पाटील , वसंत जाधव, दयानंद झेंडे, कुमार गायकवाड, संदीप पांढरे  , अमोल बोंद्रे यांनी विश्वास व्यक्त केला.
close