चाकूर। संजय माकणे( तालुका प्रतिनिधी ):
रोटरी क्लब ऑफ चाकूर यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास चाकूरचे पोलीस निरीक्षक माननीय सोपान शिरसाट यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला विठ्ठलरावजी माकणे, रोटरीचे अध्यक्ष विकास हाळे, सचिव सुरज शेटे, प्रोजेक्ट मॅनेजर शिवदर्शन स्वामी तसेच रोटरीचे सर्व सदस्य व पत्रकार बंधु उपस्थित होते.
आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये रक्तदात्यांचा पण प्रचंड प्रतिसाद दिसून आला यावेळी 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे आभार रोटरीचे अध्यक्ष विकास हाळे यांनी यावेळी मानले.

