राजगुरुनगर। प्रतिनिधी (विद्याधर साळवे):
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजगुरूनगर येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिक आज दिवसभर येत होते.
रविवार (दि.०६) रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे राजगुरुनगर येथील एसटी बस स्थानका समोर असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजगुरुनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने सामुदायिक अभिवादनासाठी सकाळी ९ वाजता पुतळ्याजवळ अभिवादन सभा आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोक कडलक यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे पि.के.पवार यांनी सामूहिक धम्म प्रार्थना व बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामुदायिक अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष संतोष डोळस,सचिव विद्याधर साळवे, संचालक विजय घेगडमल,प्रदीप अंकुश,भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र भोसले, सिद्धार्थ कडलग,दीपक नितनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दिवसभरात खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, वैभव घुमटकर, मा. जि.प.सदस्य पि.टी.शिंदे, जि.रं. शिंदे आदी मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

