shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार - पालकमंत्री कु.आदिती तटकरे..!!


राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:- 
पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे प्रांताधिकार्‍यांना दिले आदेश

पेण तालुक्यात एका अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या केल्याची घटना धक्कादायक आणि संतापदायक आहे.

पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याची माहिती पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली.

काल दुपारी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला, त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. यावेळी पोलीस महानिरीक्षक संजय माेहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव उपस्थित हाेते.

यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंबधी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते व रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना दिल्या. 

तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे, शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे आदेशही त्यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिला
आता सगळे गप्प का?

हाथरस मध्ये जेव्हा अश्या प्रकारची घटना घडली तेव्हा अख्या देशात प्रचंड त्याचे पडसाद उमटले व मोदी सरकार चा पर्यायाने योगी सरकारचा प्रचंड निषेध केला गेला त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील रोह्यातील तांबडी  व आता पेण मधील आता महाराष्ट्रातील राज्य सरकारने ह्या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व गृहमंत्री राजीनामा देणार का ?  
विरोधी पक्षनेते तशी मागणी लावून धरणार का ? 
आता सरकारचा निषेध करण्यासाठी लोक कॅडल मार्च काढणार का ?  सरकारचा निषेध करणार का ?
close