shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक सहकार्यामधून ग्रामस्थांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे मेजर अनिल लगड यांना एकलहरे येथील प्रभाग २ मधून अपक्ष उमेदवारी..!!

वडाळा महादेव [ वार्ताहर ] : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील निवृत्त माजी सैनिक श्री अनिल लगड यांनी ग्रामस्थांना वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन श्री मेजर लगड यांना अपक्ष उमेदवारीसाठी आग्रह धरला ग्रामस्थांच्या सहकार्यानेच पुढील कार्यासाठी ग्रामस्थ व सहकारी वर्ग या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रलंबित कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना राबवणार असल्याची माहिती श्री लगड यांनी दिली आहे.
               मेजर श्री अनिल लगड

शासनाच्या विविध योजना असून त्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या सर्व बाबीचा विचार करून परिसरातील वयोवृद्ध नागरिक यांना निवृत्ती वेतन तसेच संजय गांधी रोजगार योजना, अंध अपंग बांधव यासाठी शासकीय मदत तसेच शेतकरी वर्गासाठी किसान सन्मान योजना या बाबींचा विचार करून गोरगरीब जनतेला मिळवून देणार असल्याची माहिती श्री लगड यांनी दिली.

 तसेच शासकीय जिल्हा परिषद योजनेतून व वित्त आयोगाच्या माध्यमातून परिसरातील पाणी रस्ते व विद्युत पुरवठा, तरुण मुलांसाठी व्यायाम शाळा अशी संकल्पना श्री लगड यांनी व्यक्त केली आहे. परिसरातील तरुण व तसेच नागरिकांच्या मदतीने श्री लगड यांच्या उमेदवारीबद्दल आशा आहे. त्यामुळे परिसरात त्यांच्या उमेदवारीमुळे  आनंद व्यक्त होत आहे.
close