इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: इंदापूर पंचायत समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सण २०१९ - २० मधील शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या व जिल्हास्तर गुणवत्ता यादीत आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अमृता शिंदे , रोहित जाधवर ,आयुष्य भोंग,श्रावणी वाघ, श्रेयश दराडे या विद्यार्थ्यांचा शाल ,श्रीफळ ,फेटा व हार घालून सत्कार (देि.२ डिसें.२०)संपन्न करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ.स्वातीताई शेंडे ,उपसभापती संजय देहाडे. माजी सभापती सौ.पुष्पाताई रेडके ,माजी सभापती करणसिंह घोलप, माजी उपसभापती देवराज जाधव, पंचायत समिती सदस्य सौ.सारिकाताई लोंढे , ॲड. हेमंत नरुटे, बाळासाहेब काळे,गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे, विषयतज्ञ तुकाराम पाडुळे, मार्गदर्शक शिक्षक सचिन गायकवाड, प्रमोदकुमार कुदळे, जयश्री गावडे, संदीप येवले ,मारुती दराडे,पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व पालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक सर्व पंचायत समितीच्या मान्यवर व अधिकारी वर्ग यांच्यावतीने करून शुभेच्छा देण्यात आल्या.

