shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाऊसाहेब नेने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबीर संपन्न...!!



राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :-
संस्थेचे अध्यक्षअँड. मंगेश नेने यांच्यासह ४०रक्तदात्यांनी केले रक्तदान....

दि.२४/१२/२०रोजी भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिरात संस्थेचे अध्यक्ष अँड. मंगेश नेने यांच्यासह एकूण ४०रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोनाच्या भिती मुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी मा.मुख्यमंत्री आणि मा.आरोग्यमंत्री यांनी शासनस्तरावर रक्तदात्यांना आवाहन करण्यात केले होते.यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.टी.डी. माळवे यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कोरोना विषाणू विषयी जनजागृती, सोशल डिस्टंसिग, हात स्वच्छ धुणे, मास्क इ.विषयी माहिती देण्यात आली. 

   या प्रसंगी पेण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अँड.मंगेश नेने, प्राचार्य डॉ. सदानंद धारप, ज्यू.महाविद्यालय प्राचार्य शशिकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत एन.एस. एस. प्रमुख डॉ. टी. डी. माळवे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा गिरीश उपाध्ये यांनी केले.यावेळी मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.सुधीर पुराणिक सर यांचीही विशेष उपस्थिती होती.

महाविद्यालयात रेड रिबन क्लब अंतर्गत एचआयव्ही एड्स विषयी जनजागृतीपर माहिती उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक सौ.मंदा पाटील यांनी उपस्थितीतांना  मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे(रक्तकेंद्र)डॉ. दिपक गोसावी यांनी रक्तदानाविषयी माहिती उपस्थितांना सांगितली.जिल्हा रुग्णालय अलिबाग रक्तपेढी(रक्तकेंद्र)तर्फेडॉ. दिपक गोसावी व त्यांचे सहकारी यांनी रक्तसंकलनाचे काम केले.

 सदर रक्तदान शिबिर यशस्वी करणे साठी राष्ट्रीय सेवा योजनेचेसदस्य प्रा.डॉ. लकडे व प्रा.सौ.मेनन यांच्या सह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग एन.एस एस विद्यार्थीआदी यांनी परिश्रम घेतले.
close