इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
वडापुरी: दि.२४ डिसेंबर २०२० वडापुरी येथील अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे इंदापूर तालुका मंडप मालक असोसिएशन च्या उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्ती पत्र वाटप असोसिएशनच्या अध्यक्ष रवींद्र कासार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रथम असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांची दर पत्रका संदर्भात विशेष चर्चा करून एक मताने सहमती दर्शवून अंबलबजावणी करण्याचे असोसिएशनच्या सर्व उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांनी ठरवले. यावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व मंडप मालकाच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करून त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल याची चर्चा करण्यात आली.
असोसिएशनच्या एकजूट मुळे सर्व अडचणी कशा पद्धतीने सोडवल्या जातात. याबाबत अप्रतिम अशी चर्चा आज या ठिकाणी झाल्याचे काही पदाधिकारी यांनी स्पष्ट केले .
यामुळे मंडप व्यवसाय करीत असताना अनेक अडचणी पासून मंडप व्यावसायिकांचा बचाव करता येणे शक्य झाल्याने मंडप व्यावसायिकांचे मनोबल वाढण्यास उपयोग यामार्फत झाले असल्याचे दिसून आले .यावेळी संबंधित सदस्यांना मार्गदर्शन व मनोगत व्यक्त करताना असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र कासार म्हणाले की १ जानेवारी २०२१ पासून असोसिएशनने जाहीर केलेल्या दर पत्रकानुसार असोसिएशनच्या सर्व मंडप मालक यांनी आपला व्यवसाय करावा.
यामध्ये कोणत्याही या असोसिएशनच्या व्यवसायिकानी दर कमी करून काम घेतल्यास सदर व्यावसायिकास दंड केला जाईल असे स्पष्ट केले. तसेच यावेळी उपकार्याध्यक्ष दादा पठाण म्हणाले की, मंडप व्यवसायास साठी जे दर पत्रक काढले आहे. ते सर्वांनी एकजुटीने दर कमी जास्त न करता व्यवस्थित धंदा करावा. कुणी कुणाचे नुकसान न करता आपला व्यवसाय करण्यासाठी या पद्धतीने हे दर पत्रक ठरवले आहे. या असोसिएशनचे रवींद्र कासार. अध्यक्ष , टिंकू ढवळसकर. उपाध्यक्ष, नाना बोराटे. कार्याध्यक्ष , राजेशा मुलांनी. खजिनदार , विजय राऊत.सचिव , दादा पठाण.उपकार्याध्यक्ष, अख्तर मोमीन. संपर्कप्रमुख व संचालक आणि सदस्य उपस्थित होते.

