shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

”केंद्रशासनाचे इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारीस नवसंजीवनी”..!!


 इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)

इंदापूर:दि. २३ डिसेंबर२०२०  केंद्रशासनाच्या इथेनॉल उत्पादनाच्या धोरणामुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळून उभारी घेणेस मदत होईल. तसेच अतिरिक्त साखर साठयाच्या प्रश्नावर पर्याय निघून कारखान्यांवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी, तथा कारखान्याचे अध्यक्ष  हर्षवर्धनजी पाटील, यांनी कर्मयोगी कारखान्याच्या बी हेवी मोलॅसिस उत्पादन शुभारंभावेळी व्यक्त केले. सदर बी हेवी मोलॅसिस उत्पादन शुभारंभ  हर्षवर्धनजी पाटील व श्रीमती पद्माताई भोसले व्हाईस चेअरमन यांचे शुभहस्ते आज करणेत आला.




कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून केंद्रशासन व महाराष्ट शासन निर्णयानुसार कारखान्याने बी हेवी मोलॅसिसचे उत्पादन सुरू केलेले आहे. सदर बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादन करुन ऑईल कंपनीला पुरवठा करण्यात येणार आहे. बी हेवी मोलॅसिस मुळे कारखान्याच्या उत्पादन खर्चात बचत होवून उत्पादित इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवठा केल्याने सभासदांना चांगला ऊसाचा दर मिळू शकणार आहे. सध्या देशामध्ये जवळपास ६०० कोटी लिटर्स इथेनॉलची मागणी आहे. त्यापैकी महाराष्ट राज्याचे १०८ कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने या हंगामात ८० लाख ते १ कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यास प्रतिलिटर ५७ रूपये प्रमाणे दर मिळणार आहे. महाराष्ट राज्यामध्ये बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करणारे ४८ कारखाने आहेत, यामध्ये नव्याने उतरलेले २३ कारखाने आहेत. महाराष्ट शासनाने सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करणेसाठी भांडवलाकरिता व्याज अनुदान दयावे असेही ते म्हणाले.



इथेनॉल प्रकल्पाकरिता केंद्रसरकार ६ टक्के अनुदान देत असून महाराष्ट शासनाने देखील ६ टक्के अनुदान देवून इथेनॉल निर्मितीस सहकारी साखर कारखान्यांना हातभार लावावा. याबाबत साखर संघ, नॅशनल फेडरेशन व संबंधित पेट्रोलियम कंपन्यांशी पाठपुरावा करीत असलेचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या हंगामामध्ये ३० टक्के साखर उत्पादन कमी करून त्याऐवजी इथेनॉल निर्मिती वाढविणे हा एकमेव पर्याय साखर कारखानदारीपुढे राहिलेला आहे. भविष्यामध्ये इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरण करणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.



या कार्यक्रमास दुधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, निरा-भिमा कारखान्याचे संचालक शिर्के दादा, मेघ:शाम पाटील, इंदापूर नगरपालिका उपाध्यक्ष धनंजय पाटील, शेटे सर तसेच कारखान्याचे संचालक . भरत शहा,  भास्कर गुरगुडे,  विष्णू मोरे,  हनुमंत जाधव,  मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, . सुभाष काळे,  प्रशांत सुर्यवंशी,  यशवंत वाघ, मानसिंग जगताप, . राजेंद्र गायकवाड, . राहूल जाधव, श्री. अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर,  केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, . राजेंद्र चोरमले, . पांडुरंग गलांडे,. सुभाष भोसले, सौ. जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक .बाजीराव जी. सुतार, व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.

close