shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूरला भेट..!!

 - श्री नृसिंहाचे घेतले दर्शन

इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)

नीरा नरसिंहपूर: दि.२४ डिसेंबर २०२०.राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील श्री क्षेञ निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नृसिंह मंदिराला आज (दि.२४) सायंकाळी भेट देऊन श्री लक्ष्मी-नृसिंहाची पुजा करून दर्शन घेतले. 

                     



यावेळी मंदिराच्या सभामंडपात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने सत्कार केला. तसेच श्री लक्ष्मी नृसिह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त अभय वांकर यांनी सत्कार केला. 

               


याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मंदिर परिसरात चालू असलेल्या विकासकामांची माहिती  दिली.तर दशरथ राऊत यांनी प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना चहा दिला.यावेळी  खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूरचे शहराध्यक्ष शकील सय्यद इत्यादीसह इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

close