shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतननानिमित्त माऊली आश्रमातील मुलांना फळे वाटप व खाऊ वाटप...!!


इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर: २२/१२/२०.आरपीआय (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर येथील माऊली बालक आश्रम येथे आश्रमातील मुलांना फळे वाटप व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी मुलांसमवेत केक कापला व अभिष्टचिंतन साजरा केला.


या मुलांसमवेत अभिष्टचिंतन साजरा केल्यामुळे जो आनंद मला प्राप्त झाला आहे, तो शब्दात मांडणे अतिशय कठीण आहे अशी प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी यावेळी दिली.


अभिष्टचिंतन हे फक्त औचित्य असते, हे औचित्य साधून आपण सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रम राबविल्यामुळे औचित्यास एक वेगळे महत्त्व निर्माण होते. संदिपानजी कडवळे व त्यांच्या सहकारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभारी आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद,इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम, नितीन आरडे ,राजाभाऊ घाडगे, युवामित्र श्रीयश नलवडे, ॲड. आसिफ बागवान, ललेंद्र शिंदे, नदीम बागवान,सुधाकर ढगे, सुशांत षटकार यावेळी उपस्थित होते.
close