राहुरी । प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत निवडणूकी वर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष असते, कारण मोठा मतदार संघ, पंचायत समिती आणि जिल्हापरिषद मध्ये सत्ता स्थापनेसाठी आवश्यक चाचणी परीक्षा सहसा येथूनच होत असते.
नुकतेच वांबोरीतील सुशिक्षीत, सुज्ञ, समजदार तरूणांनी आयोजित केलेल्या बैठकीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात चर्चा झाली. त्यात उपस्थित सर्वांच्या एक मताने निर्णय झाला की, सत्ताधारी गटाचे निष्क्रिय कार्य व विरोधक गटाचे ' तेरी भी चुप मेरी भी चुप ' या भुमिकेला कंटाळलेल्या जनतेला वांबोरीत प्रथमच सर्वागीण विकास, प्रलंबित विकास कार्य,अनेकांच्या कामांची अडवणूक या मुद्द्यांना हात घालून वांबोरी ग्रामपंचायत उमेदवारी लढवण्याची प्रचंड ईच्छा असल्याचे अनेकांनी बोलून दाखवली. त्यात काहीनी पक्षाचे उमेदवारी तिकीट न मिळाल्यास स्वतः च्या अस्तित्वासाठी बेधडकपणे अपक्ष अर्ज भरुन उमेदवारी लढवणार आहे असे सांगितले.
यावरून असे लक्षात येते, की वांबोरीतील जनतेमध्ये सत्ताधारी व विरोधकांवर प्रचंड चिड आणि आक्रोश असल्याचे प्रथमदर्शनी चित्र दिसत आहे. जनतेला देखील अनेक वर्षांपासून पर्याय हवा होता पण दुदैवाने पर्याय उपलब्ध नसल्याने नाईलाजाने आहे त्यामध्ये तजवीज करत होते.
सामाजिक कार्याच्या जोरावर, गोर गरीब, थोरांच्या आशिर्वादाने वांबोरीतील स्वच्छ, निष्कलंक, अभ्यासू आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, मा. राधेश्याम कुसमुडे यांच्या नेतृत्वाखाली तिसरा पँनल अर्थात पर्याय वांबोरीतील मतदारांना यावेळी ख-याने उपलब्ध होत आहे. बैठकीला शेकडो गामस्थ तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

