shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घारगाव शिवारात दोन दुचाकींचा अपघात : पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी. ..!!


संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):

१९ डिसेंबर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. सदर दुचाकी अपघात झुंबरबाई वसंत मधे वय वर्षे ४५, राहणार खैरदरा नांदूर खंदरमाळ तालुका संगमनेर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वसंत  मधे व झुंबरबाई मधे हे दोघे नांदूर खंदरमाळ गाव अंतर गत असलेल्या खैरदरा येथील राहणार असून ते आपल्या दुचाकीवरून बोटा याठिकाणी 
पाहुण्यांकडे गेले होते. 

पाहुण्यांना भेट देऊन ते पुन्हा घारगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळ आल्या असता  त्याच दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकी मोटरसायकलने त्यांना धडक दिली. त्यामुळे झुंबरबाई यांच्या डोक्याला व तोंडाला मार लागताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना औषधे उपचार साठी संगमनेर येथे नेण्यात आले त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

तर त्यांचे पती वसंत मधे हे देखील गंभीर जखमी झाले  असून त्यांच्यावर औषधोपचार चालू आहे. याप्रकरणी घुलेवाडी येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरी वरून आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
close