लोहा । प्रतिनिधी(अशोक सोनकांबळे) :
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहा शहरातील जायकवाडी वसाहतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय, निमशासकीय अधिकारी ,कर्मचारी संघटना, जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई प्रदेशाध्यक्ष बी .बी गायसमुद्रे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले,
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष गायसमुद्रे म्हणाले की जीवनामध्ये आचरन करताना महामानव डॉ. बाबासाहेबांचे अमूल्य विचार त्यांचा त्याग सर्वांनी सतत डोळ्यासमोर ठेवावा, आपण सर्व जण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक असून आंबेडकरी चळवळीला गती देण्यासाठी सर्वांनी येणाऱ्या काळात पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी गायसमुद्रे यांनी बोलताना केले ,यावेळी अभिवादन कार्यक्रमात आर.टि. पंडित,टी.टि. वाघमारे ई. टी. ठाकूर ,विशाल गायसमुद्रे, ग्राम विस्ताराधिकारी कांबळे, पत्रकार अशोक सोनकांबळे, पत्रकार हकीम शेख आदीसह कार्यकर्ते सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.

