shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दि.०६/ रोजी नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना..!!

नगर :(-प्रतिनिधी) शिवा म्हस्के

ज्या महामानवाने हजारो वर्ष  वंचित,शोषित,निराधार,गावकोसाबाहेर गावगाड्यापासून दूर आसलेल्या समाजाच्या वेदना स्व:ता भोगल्या आणि आपल्या समाजाचा स्वाभीमान जागृत करुण स्पृश्य, अस्पृश्य यातील दरी नस्ट करून समता पृस्थापीत केली,मागास समाजाच्या वेदनांनी गोलमेज परिषदा गाजवल्या.

गोरगरिब ,विकासापासून कोसो दूर असलेल्या समाजाला राजकिय आरक्षण, शिक्षणात आरक्षण,नोकरी मधे आरक्षण आणि नोकरी मधिल पदोन्नोती मध्ये आरक्षणाची संविधानातच तरतुद केली.महिलांचे हक्कासाठी हिंदू कोड बिल  संसदेत मांडले. रिजर्व बैंक औफ़ इण्डिया ची स्थापना केली. 

भाक्रा नांगल हिराकूड धरणाचे प्रकल्प राबीविले. कीड्या मुंगीचे जीवन जगण्या पेक्षा, आपण काही समाजाला देण लागतो ही भावना रुजवन्याचा संदेश दिला अशा महामानव विश्वरत्न परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी,जावळे गुरुजी, दादासाहेब आगळे,संजय भापकर, माऊली कुताळ, दादा जावळे, डॉ.विलास सकट,भाऊसाहेब शिंदे, अरुण जावळे, अनिल सकट, विकास शिर्के, इ.नागरीक उपस्थित होते.
close