रुईछत्तीसी। प्रतिनिधी :
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर शहरामध्ये प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे आयोजन तुम्ही आम्ही सर्व मित्र परिवार या शीर्षकाखाली करण्यात आले होते. यासाठी सामाजिक कार्यकर्ते - मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक शाम कांबळे आणि मनोज पवार यांनी यासाठी विशेष कष्ट घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान साठी स्वयंस्फूर्तीने आलेल्या सौ. अक्षदा प्रवीण गायकवाड आणि प्रवीण गायकवाड या पत्नी - पतीच्या रक्तदानाने झाली.
अहमदनगरमध्ये प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.
५८ रक्तपिशव्यांचे संकलन ५८ रक्तदात्यांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार अभियानाचे ॲड. संतोष गायकवाड, डॉ.संतोष साळवे,अशोक केदारे,दिपक गायकवाड,प्रा.अमोल खाडेसर ,विवेक भिंगारदिवे,अमित भंडारे, चंद्रकांत बिरारे,संतोष तिजोरे,तैय्यब तांबोळी,रुद्राक्ष कांबळे,प्रसाद कांबळे, रिझवान शेख,महेश बोरुडे ,अजित कोतकर,अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.
सर्व रक्तदात्या मित्रांचे शाम कांबळे यांनी आभार मानले.
या शिबिरासाठी आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

