shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस नाईक याला एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले..? पोलीस खात्यात खळबळ...!!

संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप) :
पोलीस नाईक ला एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले...! नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ..!!


संगमनेर शहरात एका व्यापाऱ्याची पत्नी हरवले असल्याने सदर प्रकरण बंद करण्यात यावे.अशी सदर व्यापा-याने विनंती केली. परंतू तेथील पोलीस नाईक याने प्रकरण बंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत पथकाने त्याला रंगेहात पकडले.

ही घटना १२ डिसेंबर ला सुमारे ४:३० वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर घडली आहे. 

सविस्तर माहिती असे की संगमनेर शहरा मध्ये एका व्यापा-याची पत्नी हरवली होती. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली होती. मात्र सदर महिला दुसऱ्या दिवशी आढळून आली आहे. महिला सापडल्यामुळे  मिसिंग प्रकरण बंद करण्यासाठी म्हणून पोलीस नाईक देशमुख याने या व्यापाऱ्याकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे व्यापारी याने नाशिक येथील लाचलुचपत पथकाला तक्रार केली. त्यानंतर नाशिक येथील पथकाने सापळा रचला होता. या सापळ्यामध्ये पोलीस नाईक देशमुख अलगदपणे अडकला.
  
लाचलुचपत पथकाचे पोलिस निरीक्षक व टीमधील पाटील, सपकाळ, महाजन, यांनी या प्रकरणांमध्ये मोलाची कामगिरी बजावली.
close