shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३ लाखाचा गुटखा व इरटिगा कारसह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त,हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही..!!

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 
दि.१३,सेनगांव ते हिंगोली महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे दि.१३ डिसेंबर रविवार रोजी पेट्रोलींग करीत असतांना एका इटरिगा कारमध्ये ३ लाखाचा गुटखा आढळुन आल्याने कारसह १३ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याने गुटखा माफीयात एकच खळबळ उडाली आहे.


सविस्तर माहिती अशी की,दि.१३ डिसेंबर रविवार रोजी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हिंगोली ते सेनगांव मार्गावर पेट्रोलींग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की,एक काळसर राखाडी रंगाची मारोती सुझुकी कंपनीची इरटिगा कार क्रमांक एम.एच.३७ व्हि ४७२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सेनगांव कडुन हिंगोलीकडे घेऊन येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घेवारे यांना मिळाल्यावरुन पथकातील पोलीस स्टाप यांनी हिंगोली ते सेनगांव रोडवरील मौजे राहोली फाटा येथे थांबुन येणाऱ्या सदर वर्णनाच्या इरटीगा कारला थांबवुन कारची तपासणी केली असता कारमधील मागील सिट काढले असता मागच्या बाजुस पांढ-या रंगाचे एकावर एक रचलेले पोते दिसुन आले.सदर कारमध्ये आत जाऊन बारकाईने तपासणी केली असता त्यात जनतेच्या आरोग्यास हानिकारक शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटख्याचे एकुण १६ पोते मिळुन आले,आतील पोत्याची पाहाणी केली असता त्यामध्ये गोवा १०००,राजनिवास पानमसाला कंपनीचा सुगंधित पानमसाला/गुटखा पोते मिळुन आले.



सदर कारचे चालक गोपाल भागवत रंजवे व त्याचे सोबत असलेले विनोद भागवत रंजवे दोघे ही रा.भोकरखेड ता.रिसोड जि.वाशिम यांना विचारले असता त्यांनी सदरचा गुटखा हा चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी हिंगोली कडे नेत असल्याचे सांगितले.सदर वाहनामधील महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा,राजनिवास पानमसाला कंपनीचे सुगंधित तंबाखुच्या १६ पोते एकुण किंमत ३ लाख १७ हजार २८० रुपयेचा व इरटीगा कार किंमत १० लाख रुपये असा एकुण १३ लाख १७ हजार २८० रुपयेचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर २ आरोपी विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे.सदरची कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर,अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे,पोलीस निरीक्षक यु.ए.खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे पो.ह.विलास सोनवणे,शंकर जाधव, महिला पो.हे.काँ.रेश्मा शेख,पो.ना.ज्ञानेश्वर सावळे,किशोर सावंत,दिपक पाटील,आकाश टापरे,म.पो.शि.रविना घुमनर यांच्या पथकाने केली आहे.
close