shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर ५०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!!


टेभुर्णी । (प्रतिनिधी) :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्य़ातील माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टें व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून १२ डिसेंबर रोजी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना,पिंपळनेर येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहीती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

      सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक तथा जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या  शुभहस्ते कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवर व कारखाना अधिकारी यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी विठ्ठलराव शिंदे कार्यकारी संचालक आर.एस.रणवरे,जनरल मॅनेजर एस.आर.यादव,मुख्य शेतकी अधिकारी एस.पी.थिटे, वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे, चिफ केमिस्ट येलपले पी.एस,फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही बागल,शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर,परचेस आफिसर जे.डी.देवडकर,सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे,सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे व कर्मचारी उपस्थित होते.

सदर शिबीरामध्ये हेगडेवार ब्लड बँक-सोलापुर, रामभाई शहा ब्लड बँक बार्शी, भगवंत ब्लड बँक बार्शी, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक-अकलुज, पंढरपुर ब्लड बँक पंढरपुर इ. ब्लड बँकांनी उपस्थित राहुन रक्त संकलन केले. सदर शिबीरामध्ये कारखान्याचे सभासद,शेतकरी,कर्मचारी व कार्यकर्त्यांनी उत्फुर्सपणे सहभाग नोंदविला.

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त प्रति वर्षी मोफत काशी यात्रा, मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, तसेच मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सध्या कोरोना महामारीचे पार्श्वभुमीवर कोरोनाग्रस्त रूग्ण व इतर आजारावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असल्याने विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टें व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून जून महिन्यात  माढा विधानसभा मतदारसंघामध्ये ठिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून २ हजार ५०० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आलेले होते.
close