सावळीविहीर(प्रतिनिधी ) :
शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्याकडे सपूर्द केला होता. तो नगरपंचायत प्रशासनाने अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
त्या राजीनामा अर्जाची मंजूरी अहवाल आल्यानंतर मग उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीची घोषणा होईल व नंतर उपनगराध्यक्षपदी निवड केली जाणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायत वरिष्ठ लिपिक मुरलीधर देसले यांनी दिली आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाचा मंगेश त्रिभुवन यांनी राजीनामा नगराध्यक्ष यांच्याकडे दिला होता. त्यामुळे शिर्डीत कोण उपनगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
त्यासाठी अशोक गोदंकर ,सचिन उर्फ हरिश्चंद्र कोते तसेच दत्तू कोते या नगरसेवकांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती .मात्र अहवालावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिर्डी नगर पंचायतला अहवाल प्राप्त होऊन हा राजीनामा मंजूर झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक लागेल व त्यानंतर उपनगराध्यक्ष यांची निवड होईल असे नगर पंचायात चे मुख्य लिपिक मुरलीधर देसले यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान शिर्डी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांचे पुतणे सचिन उर्फ हरिश्चंद्र कोते यांची उपनगराध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.व तशी चर्चा शिर्डीत सध्या सुरू झाली आहे.प्रत्येक जण आपापल्या परीने फिल्डिंग लावीत आहे व येत्या काही दिवसातच शिर्डीला कोण उपनगराध्यक्ष होणार हे कळणार आहे. नगराध्यक्षाचे फटाके दिवाळीत फुटले ,आता नाताळ मध्ये उपनगराध्यक्ष पदाचे फटाके कोण फोडणार ?अशी चर्चा येथे सुरू आहे.

