shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'त्या' गावांना २५ लाखांचा निधी - आ. लंके यांची बंपर घोषणा..!!

पारनेर, ता.१६- पारनेर-नगर मतदारसंघातील ११० ग्रामपंचायतींचाही निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार असून सरपंच पदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे.

ज्या गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या गावांना आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार नीलेश लंके यांनी केली आहे.



आ. लंके सध्या अधिवेशना निमित्त मुंबईतआहेत. तेथूनच त्यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी २५ लाखांच्या निधीची घोषणा केली असून तेथून परतल्यानंतर ते स्वतःनिवडणूका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

आतापर्यंत प्रमुख गावांतील गटांमध्ये चर्चा करून समेट घडविण्यातही  त्यांनी यश मिळविले असून  काही मोठया गावांमधील  निवडणूका बिनविरोध  होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

लंके म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाला जाहिर झाला, त्याच वेळेपासून आपण राजकारण दुर ठेऊन प्रत्येक गावाचा सर्वागिण विकास करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. 

ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे वाद  हाणामाऱ्या होतात. त्यातून  कटूता निर्माण होते. 
 
राज्यकर्त्यांकडून हीच अपेक्षा-पवार
राज्याच्या आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, लंके यांच्या या आवाहनामुळे गावागावांतील पुढाऱ्यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. गावे विकासाच्या दिशेने घोडदौड करतील, गावागावांतील तंटे कमी होतील, राज्यकर्त्यांकडून हीच अपेक्षा असते. गावे एकसंघ राहण्यासाठी लंके यांनी चांगला उपक्रम हाती घेतला आहे.


close