सावळीविहीर (प्रतिनिधी) :
श्री साईबाबांच्या मंदिरात पवित्र स्थळी जाताना साई भक्तांनी तोकड्या कपड्यात न जाता संस्कृती प्रधान वेशभूषा करूनच मंदिर परिसरात प्रवेश करावा जेणेकरून त्यामुळे मन प्रसन्न व समाधानी राहील .हे संस्थांननी एक विनंतीपूर्वक आवाहन केले आहे मात्र कोणत्याही साईभक्तांना सक्ती नसून ड्रेस कोड लावण्यात आलेला नाही.
यासंदर्भात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी बोलताना सांगितले की, श्री साईबाबांचे मंदिर कोरोणामुळे सुमारे सात-आठ महिने बंद होते.मात्र मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर भाविक मोठ्या समाधानाने आनंदाने अटी व शर्तींचे पालन करत दर्शन घेत आहेत .तसेच येथे काही भक्तांनी तक्रार केली की येथे काही भक्त वेगळ्या, तोकड्या वेशभूषेत मंदिर परिसरात येतात.
अश्या संस्थान प्रशासनाकडे तक्रारी आल्यामुळे संस्थान प्रशासनाने साईभक्तांना आवाहन केले आहे की, श्री साईबाबांच्या मंदिरात किंवा मंदिर परिसरात भारतीय संस्कृतीप्रमाणे वेशभूषा असावी जेणेकरून मन प्रसन्न आनंदी व संस्कृतीचे रक्षण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र साईभक्तांना कोणत्याही ड्रेस कोड लावलेला नाही हेही त्यांनी आवर्जून यावेळी सांगितले. तसेच साईभक्तांना समजावे म्हणून संस्थानने तसे फलक लावले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान शिर्डी येथे पवित्र स्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थान परिसरात व श्री साईबाबांच्या दर्शनाला मंदिरात जाताना भारतीय संस्कृती जपत वेशभूषा करुनच प्रवेश करावा. अशी विनंती करणारे फलक श्रीसाईबाबा संस्थानने नव्याने लावले आहेत. मात्र या फलकावरील अक्षरे फार छोटी असल्यामुळे ते सहजासहजी साईभक्तांच्या लक्षात येत नाही.त्यामुळे साईबाबा संस्थानने हेच फलक मोठ्या अक्षरात व मोठे करून व संस्थान परिसरातील प्रवेश द्वारा बरोबरच साई संस्थान च्या प्रसादालय, निवास्थाने आदी महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.
श्री साईबाबांच्या दर्शनाला देश-विदेशातून साईभक्त येत असतात. श्री साईबाबांचे मंदिर हे पवित्र स्थान असून संस्थान परिसरात व मंदिरात दर्शनाला जाताना अनेक साईभक्त हे आपली वेशभूषा पर्यटनस्थळ असल्यासारखे करतात वेगवेगळ्या वेशभूषा काही साईभक्त मंदिर परिसरात किंवा मंदिरात पूर्वी जात होते मात्र मंदिरात जाताना व परिसरात जाताना प्रत्येक साई भक्ताने पुरुष असो महिला असो त्यांनी भारतीय संस्कृती नुसार आपली वेशभूषा ठेवावी. असे फलक पूर्वी साईबाबा संस्थांननी प्रवेशद्वारासमोर लावले होते. त्यामुळे साई भक्त त्याचे काही प्रमाणात का होईना आचरण करीत होते.मात्र गेल्या सात-आठ महिन्यापासून ते धूळ व इतर गोष्टीने थोडेसे खराब झाले होते.त्यामुळे आता परत नव्याने ते बनविण्यात आले असून तेथेच लावण्यात आले आहे.मात्र या फलकावरील अक्षरे फार छोटी असून सहजासहजी साईभक्तांच्या ते लक्षात येत नाही.त्यामुळे मोठ्या अक्षरात हेच फलक संस्थानने परिसराच्या चारही प्रवेशद्वारासमोर लावावेत.
त्याचप्रमाणे प्रसादालय, निवास्थाने तसेच इतर मंदिरे व महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी असे फलक साईबाबा संस्थांननी लावावेत की जेणेकरून साईभक्तांच्या ते पटकन लक्षात येईल व साईभक्त त्याचे आचरण करतील असे साईभक्तां मधून बोलले जात आहे.

