सावळीविहीर (प्रतिनिधी) :
शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज एक डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 2 अर्ज दाखल करणे व दोन नंतर अर्जाची छाननी झाली.तेव्हा तीन उमेदवारांचे चार अर्ज वैध ठरले आहेत. एक अर्ज बाद झाला आहे. अशी माहिती शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी वैध ठरलेल्या अर्जदारा पैकी तीन उमेदवारअसून त्यामध्ये शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिताताई जगताप तसेच शिवाजी अमृतराव गोंदकर व जगन्नाथ गोंदकर या तिघांचे अर्ज वैध ठरविण्यात आले . या तिघांपैकीच आता कोण शिर्डीचा नगराध्यक्ष होणार? हे येत्या काही दिवसातच कळणार आहे.
शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवड सात डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये दोन अर्ज बाद ठरले असून शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व शिर्डीच्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिताताई विजयराव जगताप तसेच शिवाजी अमृतराव गोंदकर तसेच जगन्नाथ गोंदकर या तीन उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून या तिघांमधुनच शिर्डीचा नवीन नगराध्यक्ष सात डिसेंबरला होणार आहे.
त्यासाठी आता तिन्ही उमेदवाराकडून फिल्डिंग लागली आहे ,शिर्डीचा नगराध्यक्ष श्री साईबाबा संस्थान वर पदसिद्ध विश्वस्तही असतो. या सर्वांमुळे शिर्डी नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते. याकडेच आता सर्व शिर्डीकरांचे व साईभक्तांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिर्डीच्या शिवसेना महिला आघाडीच्या नगरसेविका अनिता ताई जगताप यांनी शिर्डी नगरपंचायत मध्ये 2014 चा इतिहास पुन्हा घडणार..! कमळाचा नगराध्यक्ष होणार नाही असे धडधडीत सांगून आपणच नगराध्यक्षा चे दावेदार असल्याचे सांगितले तर शिवाजी अमृतराव गोंदकर व जगन्नाथराव गोंदकर यांनी आपणच शिर्डीचे नगराध्यक्ष होणार! असे ठामपणे सांगितले आहे, मात्र येणारा काळ शिर्डी चा नगराध्यक्ष कोण राहील हे ठरवणार! मात्र याबाबत शिर्डीत सध्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान आज शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज दाखल करण्यात आले या पाचही नामनिर्देश पञाची छाननी दुपारी दोन वाजता करण्यात आली. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉम्फंसिंगद्वारे ही प्रक्रिया पार पडली,यात एकुण तीन उमेदवारांचे पाच नामनिर्देश पञ या कालावधीत सादर करण्यात आले होते. या पाच नामनिर्देश पञाची छाननी आज दुपारी केल्यानंतर चार नामनिर्देश पञ वैध ठरले असुन आता एकुण तीन उमेदवार आणि चार नामनिर्देश पञ अशी स्थिती असल्याचे या शिर्डी नगरपंचायत चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितलेआहे.

