shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार..!!

हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१८,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे तालुका उपाध्यक्ष गणेशराव जारे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने भाजपला जोरदार धक्का बसला असून आज दि.१८ डिसेंबर शुक्रवार रोजी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा सेनगांव भाजपचे उप तालुकाध्यक्ष कैलासराव खाडे यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे हिंगोली उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कळमदुरीचे आमदार तथा हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषदादा बांगर यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

सेनगांव नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर नुकतेच सेनगांव भाजप उप तालुकाध्यक्ष गणेशराव जारे यांनी राजीनामा दिल्याने जोरदार धक्का बसला या धक्क्यातून भाजप नुकतीच सावरत असतांना आज दि.१८ डिसेंबर शुक्रवार रोजी सेनगांव तालुक्यातील भाजप नेते तथा सेनगांव भाजपचे उप तालुकाध्यक्ष कैलासराव खाडे,सुंदरराव खाडे,पंडीत ढाकणे यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषदादा बांगर यांच्याहस्ते हिंगोली येथील शिवसेना कार्यालयात शिवसेनेत प्रवेश केला.बांगर यांनी त्यांना शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश दिला आहे.यामुळे भाजपला सेनगांव नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मोठे खिंडार पडल्याचे दिसुन येत आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,नगरसेवक रामभाऊ कदम,सेनगांवचे उप नगराध्यक्ष प्रविण महाजन,सुदाम मुंढे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया 
भाजप कडुन आमच्या सारख्या विश्वासु निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याने व कुठल्याही कार्यक्रमात मान दिल्या जात नसल्याने मी आज असंख्य कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला असुन शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण करण्यास भर देणार आहे. 

                       कैलासराव खाडे
close