shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवीन निर्यात धोरणामुळे शेतकर्यांचा फायदा -अंकिता हर्षवर्धन पाटील...!!

ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपन्न.

इंदापूर प्रतिनिधी :- दि.१८ डिसेंबर २०.ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केंदीय रेल्वेमंत्री, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री  पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. यावेळी इसमाच्या सर्वात तरुण सदस्या व कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून साखर उद्योगाबाबत व निर्यात धोरणाबद्दल आपले विचार व्यक्त केले. 


केंद्राने जाहीर केलेल्या नवीन निर्यात धोरणामुळे देशातील कारखाने जास्तीत जास्त साखर निर्यात करतील व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देतील असा विश्वास कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी चालू असलेल्या साखर कारखानदारी बाबतीतील अडचणींवर चर्चा झाली तसेच केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व साखर उद्योगासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी वरती व चालू असलेल्या हंगाम परिस्थितीबाबतील शिफारसही ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या वतीने केंद्र सरकारला पाठविण्याबाबत चर्चा झाली.
close