श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील पत्रकार राजेंद्र देसाई यांना "वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड -२०२० '' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पञकार राजेंद्र देसाई सन्मान स्विकारताना
राजेंद्र देसाई यांनी सामाजिक, अध्यात्मिक पत्रकारिता, साहित्य तसेच नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघ यांनी दखल घेऊन महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, महाराष्ट्र राज्य संपादक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कुलथे, डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर चॅप्टर)चे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे, प्रा.डॉ.दादाराव म्हस्के प्रा.आदिनाथ जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला प्रसंगी फक्त निमंत्रितांनाच आमंत्रित करण्यात आले होते.

