shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर साई संस्थांनच्या जनसंपर्क अधिकारी पदाच्या मुलाखती झाल्या..! आता नियुक्तीची साईभक्तांना प्रतीक्षा!!


सावळीविहीर (राजकुमार गडकरी):-
शिर्डीचे साईबाबा संस्थानच्या बहुचर्चित रिक्त जनसंपर्क पदासाठी साईबाबा सस्थानने कायम कामगारामधुन प्रभारी आधिकारी म्हणून अर्ज मागविण्यात आले होते. जवळपास पधरा ते वीस कामगारांनी मुलाखती दिलेल्या आहेत, मात्र या पदावर कोणाची नियुक्ती होते.याकडे साईबाबा संस्थान कामगारांसह ग्रामस्थ साईभक्ताचे लक्ष लागले आहे.

जनसंपर्क या पदासाठी अनेकांनी आपल्या पध्दत्तीने फिल्डींग लावली होती,मात्र मोठ्या प्रमाणावर झालेला गाजावाजा आर टी आय च्या कार्यकर्ते यांनी घातलेले लक्ष व मुख्य कार्यकारी कान्हुराज बगाटे यांची ठोस भुमिका यामुळे सहजपणे मिळणाऱ्या संधीवर काहींना पाणी सोडावे लागले. याच पदासाठी काहीनी थेट संगमनेर तर कधी लोणीच्या माध्यमातून देखील जोरदार प्रयत्न केले असले तरी आता कार्यकारी अधिकारी हे  जनसंपर्क आधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रतेला महत्त्व देणार का या ? या बरोबरच  राजाश्रयीत उमेदवाराला संधी मिळते की काय? याकडे जसे इतरांचे लक्ष लागले आहे. 

तसेच आर टी आय कार्यकर्ते यांचे देखील लक्ष याकडे लागले आहे.या पदासाठी संधी देताना नियमावली चे पालन झाले पाहिजे यासाठी त्यांनी राज्य प्रधान सचिव व विधी व न्याय विभागाचे लक्ष वेधले असुन योग्य त्या उमेदवारालाच संधी मिळेल. यावर त्यांचा विश्वास आहे. जनसंपर्क अधिकारी यांना चार ते पाच भाषा येणे गरजेचे आहे.

उच्चशिक्षित व पत्रकारितेचा कोर्स झालेला उमेदवार असावा व सर्व क्षेत्राचे माहिती असावी असा असावा असेही साईभक्तांमधुन बोलले जात आहे. त्यामुळे आता या पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामधून कोणाची वर्णी लागते याकडे सर्व साईभक्त शिर्डीकर व संपूर्ण देश-विदेशातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
close