shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे.. अंकिताताई पाटील..!!


इंदापूर प्रतिनिधी:
दि. 1 डिसेंबर २०. पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाचे मतदान आज  होत आहे. यानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी बावडा येथे मतदानाचा हक्क बजावला.


यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे व योग्य उमेदवार निवडून द्यावा.

      
सर्व युवकांच्या दृष्टिकोनातून ही विधान परिषदेची निवडणूक महत्त्वाचे आहे. आपल्यासारख्या अनेक सुशिक्षित मतदारांचा प्रतिनिधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपण निवडून देणार आहोत. मतदान हा आपला अधिकार आहे. हे मतदान  आपल्या आयुष्यावर दृश्य-अदृश्य परिणाम करणारा आहेत. मी ही आज बावडा मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावला आपण ही आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन यावेळी कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले.
close