shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळाकडे लक्ष द्यावे -- सौ. शितलताई दांगट..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:- 
क्रिडा विभागाद्वारे संचालित फिट इंडिया मुहमेंट अंतर्गत  फिट इंडिया कॅम्पेन डिसेंबर 2020 चे आज साने गुरुजी निवासी प्रा.मा. विद्यालय केज यांच्या वतिने आयोजन करण्यात आले होते. केज येथिल जय भवानी चौक ते धारुर रोड शाळेपर्यंत विद्यार्थ्यांची सायकलोथॉन  आयोजित करण्यात आली होती .             


या सायकल रॅलीला केज नगरीच्या मा.नगराध्यक्षा सौ. शितलताई पशुपतिनाथ दांगट यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ऊदघाटन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी  विद्यार्थ्यांना सायकल चालविण्याचे महत्व पटवुन दिले तसेच सकाळी लवकर उठुन व्यायम करणे हे आरोग्यासाठी फार महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.    
    
या प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अॅड. उद्धवराव कराड साहेब, मुख्याध्यापिका डॉ.सौ. कविताताई कराड मॅडम, क्रिडाशिक्षक सानप सर, चाटे सर, मजहर शेख यांनी सुद्धा विद्यार्थ्यां सोबत सायकलिंग केली. 


 ***केज शहरात विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शारीरिक तंदुरुस्ती साठी आसे आयोजन करण्यात यावे या कामी आमचे संपूर्ण सहकार्य राहिल असे आश्वासन सितलताई दांगट पाटील यांनी या प्रसंगी दिले. ***
close