shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

बावडा येथे  मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न..!!
इंदापूर प्रतिनिधी: तात्याराम पवार
बावडा: २९ डिसें.२०२०
जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर बावडा येथे आयोजित केले



बावडा लाखेवाडी जि.प.सदस्या अंकिता पाटील यांच्या अभिष्टचिंतननिमित्त डोळ्यांची  तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप आणि डोळ्याचे मोतीबिंदू शिबीर बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी    एच व्ही देसाई नेत्र रूग्णालय हाडपसर ( दि २६) रोजी तर चितांमणी बहुउद्देशीय विकास संस्था फलटण यांच्याद्वारे 
 (दि.२७) रोजी  आबेंडकरनगर येथे बुध्दविहारा याठिकाणी  बावडा ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे यांच्या विशेषसहकार्यातून  शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी किरण पाटील  म्हणाले  की,अभिष्टचिंतन व विशेष सणांचे औचित्य साधून कार्यकत्यांनी तळागाळातील लोकांनसाठी आरोग्य शिबीरासारखे सामाजिक उपक्रम सातत्याने राबिवले पाहिजेत असे मत व्यक्त केले"
या नेत्र तपासणी शिबीरात जवळपास ५०० लोकांनी आपले डोळे तपासून घेतले. डोळ्याची तपासणी करून नंबरनुसार रूग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी ४८जण मोतीबिंदू रूग्ण आढळून आले.या रूग्णावरती महमंदवाडी या ठिकाणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. 
ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे हे नेहमी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे जनतेच्या हिताचे उपक्रम राबवून जनहित साध्य करण्याचे कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.
या शिबीरास निलेश घोगरे,(उपसरपंच),अनिल कांबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,सिध्दार्थ शरद कांबळे,शांताबाई कांबळे आरोग्यसेविका,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिबीर कार्यक्रमाला  डॉ अविनाश आडके,रमेश केंगार,ऐश्वर्या केंगार,प्रिया शिवशरण यांनी विशेष परिश्रम घेतले.
close