पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड परिसरात आज (शुक्रवारी) पहाटे पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांना सूर्यदर्शन झाले नाही. नभ दाटून आल्याने शहरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
शहर व परिसरात पहाटे अर्धा तास हलक्या सरी कोसळल्या. अवेळी आलेल्या पावसाने माॅर्निंग वाॅक आणि इतर कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पहाटे तारांबळ उडाली. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
दरम्यान, आज (दि.11) आणि उद्या (दि.12) पुणे आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

