shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी..! हरवलेला मुलगा केला नातेवाईकांच्या स्वाधीन...!!


 वडाळा महादेव (वार्ताहर) : श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नांदुर येथील सचिन नारायण गोरे हा तरुण घरांमधून कोणालाही पूर्वसूचना न देता निघून गेला होता. यासंदर्भात सचिन गोरे यांचे वडील नारायण गोरे यांनी नातेवाईक व परिसरात सतत दोन वर्ष शोधमोहीम केली अखेर मुलाचा शोध लागत नसल्याने नारायण प्रल्हाद गोरे यांनी स्वतः दिनांक १३- २- २०१५ रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे माझा मुलगा हरवला आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. 

यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री संजय दुधाडे व दत्तात्रेय दिघे यांनी परिसरात व नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली सध्या श्रीरामपूर येथील आयपीएस पोलीस अधिकारी माननीय श्री आयुष नोपाणी यांच्याशी ग्रामस्थ व नातेवाईक यांनी चर्चा केली. यावरून श्री नोपानी  यांनी घटनेची माहिती मुस्कान पथक इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांना दिली यावरून सदर सचिन नारायण गोरे याचा तपास पोलीस नाईक संजय दुधाडे व दत्तात्रय दिघे यांच्याकडे देण्यात आला यावरून दुधाडे यांनी परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती नातेवाईक यांच्याकडे पुन्हा चौकशी केली असता येथील माजी सरपंच पती विशाल गोरे यांच्या मदतीने सचिन गोरे कुठे आहे.

 याबाबत सूचना मिळाली यावरून पोलीस नाईक संजय दुधाडे; दत्तात्रय दिघे यांनी शोधमोहीम घेत सचिन यास ताब्यात घेतले व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपानी तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्यासमक्ष हजर केले असता सचिन गोरे यास कायदेशीर बाबी व पूर्तता करून आई व पत्नी ताब्यात देण्यात आले. यावरून परिसरातील नातेवाईक व ग्रामस्थ यांच्या मधून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मुस्कान पथक तसेच पोलीस नाईक संजय दुधाडे व दत्तात्रय दिघे यांचे कौतुक होत आहे. सचिन यांची आई व पत्नी यांनी प्रशासनाचे आभार मानले.
close