नवऱ्यानेच बायकोचे अर्धनग्न फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले : नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल..!!
केज। जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:-
नवरा बायको ही जशी संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत तसेच ते एकमेकांच्या सुख दु:खाचे भागीदार असतात. बायकोचे इज्जत, इभ्रत आणि अब्रू वाचविण्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर अशी भावना असते आणि तशा घटना घडतातही पण केज तालुक्यात एक आगळीक घडली ती अशी की, एक नवऱ्याने चक्क त्याच्या स्वतःच्या पत्नीचे अर्धनग्न फोटो काढून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका तरुणीचे लग्न कळंब तालुक्यातील एका तरुणाशी झाले आहे. तिच्या नवऱ्याने त्या विवाहित पत्नीचे अर्धनग्न व लज्जा उत्पन्न होईल असे फोटो काढून ते दि.२४ डिसेंबर रोजी व्हाट्सअपद्वारे विवाहिततेच्या चुलत्याला पाठविले. तसेच दि.२५ डिसेंबर रोजी त्याने ते सर्व फोटो त्याच्या स्वतः च्या व्हाट्सअप स्टेटस् वरही ठेवले. हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्यामुळे त्या विवाहितेची बदनामी झाली.
त्या विवाहितेने केज पोलीस स्टेशनला हजर होऊन तिच्या नवऱ्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून तिच्या नवऱ्याविरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. ५५३/२०२० भा. दं. वि. ३५४ (क) यासह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे करीत आहेत.

