shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड दापोडीतील कल्याण जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा, दहा जणांविरोधात गुन्हा..!


पिंपरी चिंचवड:-दापोडीतील कल्याण जुगार, मटका अड्डयावर सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी (दि.25) छापा टाकला. यामध्ये अवैधरित्या मटका खेळणा-या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 57 हजार 465 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मनोज ज्ञानेश्वर अडसुळे (वय 52, रा दोपोडी), विजय शिवाजी वायदंडे (वय 65, रा. पिंपळे गुरव), रफिक मकबुल शेख (वय 61, रा. दापोडी), सागर राजू गायकवाड (वय 25, रा. दापोडी), इब्राहिम उस्मान अत्तार (वय 38, रा. फुगेवाडी), निलेश मोहन गुहागरकर (वय 35, सांगवी), सिद्धार्थ दिगंबर कांबळे (वय 41, रा. दापोडी), नितीन मधुकर देवकाते (वय 37, रा. विश्रांतवाडी), अल्ताफ मिंतु शेख (वय 30, रा. दापोडी), मनिष अशा एकूण दहा जणांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सीआरपीसी कलम 41 (अ) (1) प्रमाणे त्यांना समजपत्र देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीतील स्मशानभुमीकडे जाणा-या रोडलगत अवैधरित्या सुरू असलेल्या कल्याण जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईत 57 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
close