shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते खरेदी-विक्री संघाच्या हमीभाव खरेदी केंद्राचे लोह्यात थाटात उद्घाटन..!!


शेतकऱ्यांची कामधेनु कलंबर सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू होणार: आमदार शामसुंदर शिंदे

लोहा (प्रतिनिधी) :
लोहा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित लोहा व दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन नांदेड अंतर्गत लोहा येथे हमीभाव   धान्य उडीद, मूग ,तूर हरभरा, ज्वारी, सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ काल गुरुवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हमीभाव खरेदी केंद्राचे आ. शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी लोहा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे नवनिर्वाचित सभापती स्वप्नील मनोहरराव पाटील उमरेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजी वैजाळे ,माजी सनदी अधिकारी अनिल मोरे ,युवा नेते संदीप पाटील उमरेकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, उपसभापती शाम अण्णा पवार, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चौडे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक आनंद चव्हाण, माजी सभापती संजय पा. कराळे ,काँग्रेस शहराध्यक्ष वसंत बापू पवार ,नगरसेवक बालाजी खिल्लारे, नगरसेवक जीवन चव्हाण, ज्ञानोबा पाटील पवार ,सुधाकर सातपुते अनिकेत पाटील जोमेगाव कर, सह नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. शामसुंदर शिंदे म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असूनहि आजही शेतकरी आर्थिक दृष्ट्या वंचित असून दारिद्र्यात जीवन जगत आहे, येणाऱ्या काळात लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी व कल्याणासाठी आपण काम करणार असून लोहा व कंधार तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प लवकरच मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसून किवळा साठवण तलाव व धोंड प्रकल्पाचे काम येणाऱ्या काही दिवसात जलद गतीने मार्गी लावले जाईल असेही यावेळी आ. शिंदे यांनी बोलताना सांगितले. 

लोहा ,कंधार तालुक्यात सह नांदेड जिल्ह्याची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या कलंबर सहकारी साखर कारखान्याचे पुनर्जीवन करण्यात येणार असून अवघ्या एक वर्षाच्या काळात साखर कारखाना गाळपासाठी सज्ज होणार असून एका प्रामाणिक कारखानदारांच्या हाती हा कारखाना जाणार असल्याचेही आ. शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .आगामी काळात मतदारसंघात सिंचन ,आरोग्य, शिक्षण, रोजगार ,महिला सक्षमीकरण बचत गट सक्षमीकरण ,दळणवळणा ला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचेआ .शामसुंदर शिंदे यांनी यावेळी  बोलताना सांगितले, यावेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे बोलताना म्हणाल्या  की लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आशा फार्मस कंपनी ची स्थापना करण्यात आली असून या कंपनीमार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा छोटासा प्रयत्न केला जाणार आहे.

मतदारसंघात महिला सक्षमीकरण, बचत गट, सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय धोरण असल्याचेही यावेळी आशाताई शिंदे यांनी सांगितले. जगाचा पोशिंदा बळीराजाने घामाने कष्टाने कमवलेल्या शेतमालाला योग्य भाव बाजारपेठ मिळत नसल्याने सर्वप्रथम धानोरा मक्ता, व कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीला व लोहा खरेदी-विक्री संघाला हमीभाव खरेदी केंद्र मंजूर करून प्रत्यक्षात  हमीभाव केंद्र सुरु करून मतदारसंघातील शेतकऱ्यांना काही अंशी न्याय देण्याचे काम अवघ्या एक वर्षात मतदार संघात 3 हमीभाव खरेदी केंद्र  सुरू करून आ. शामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघात एक नवा विक्रम  केला असल्याचेही यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले .यावेळी खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित सभापती स्वप्नील पाटील उमरेकर, उपसभापती श्याम आण्णा पवार, युवा नेते संदीप पाटील उमरेकर,  यांच्यासह सर्व संचालक मंडळाचा सत्कार आ .शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.


बालाजी खिलारे यांचा आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

 शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक बालाजी खिल्लारे यांनी खरेदी-विक्री संघाच्या नियोजित कार्यक्रमात आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला, बालाजी खिलारी यांच्या प्रवेशाने लोह्याच्या राजकारणाला रंग आल्याची चर्चा तालुक्यात चर्चिल्या जात आहे .
close