निवडणूक कालावधीत पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवुन दोषी व्यक्तीवर कारवाई करणार-सुरवाडे
वडाळा महादेव(वार्ताहार): श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर येथे मारुती मंदिर तसेच ग्रामपंचायत प्रांगणात पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
यावेळी मातापूर येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांमधून पोलीस प्रशासनास निवडणूक कालावधीत विविध उपाययोजना करण्याची मागणी केली. श्रीरामपूर येथील शहर पोलीस स्टेशन प्रभारी पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करून निवडणूक कालावधीत शांतता राखण्याचे आवाहन केले.
तसेच ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास वैयक्तिक मला किंवा अशोकनगर बीट अंमलदार पोलीस नाईक संजय दुधाडे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले. प्रसंगी पोलीस नाईक संजय दुधाडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करत निवडणूक कालावधीत आचार संहिता तसेच शासकीय नियम आदेश नियमाचे पालन करावे अशी माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांमधून निवृत्ती रायभान यांनी पोलीस प्रशासनास मातापूर येथील ग्रामस्थ हे शांतताप्रिय असून निवडणूक कालावधीत कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. असे आश्वासन दिले.
यावेळी राधाकिसन उंडे, सयाजी उंडे, बाबासाहेब डांगे निवृत्ती रायभान बापूसाहेब बनकर, कामगार पोलीस पाटील रावसाहेब उंडे,अर्जुन उंडे तुकाराम दौंड, अक्षय मते, सयाजी उंडे, गौतम गायके, शुभम शिरोळे, रशीद शेख, पोलीस कॉन्स्टेबल किरण पवार, राजेन्द्र देसाई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार रावसाहेब पाटील उंडे यांनी मानले.

