असे म्हणायचे कारण म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातील अनेक व्यक्तिमत्वे जिल्ह्याचे नाव उजळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. परंतु जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर तेथील लोक असे बोलतात जसे की आम्ही सर्वच दोषी आहोत.
आशा अविर्भावात लगेचच जिल्ह्याच्या कीर्तीचा पाढा न वाचता कुकर्माचा पाढा वाचायला सुरुवात करतात. कोठेवाडी बलात्कार, जवखेडे हत्याकांड, सोनई व जामखेड (खर्डा) जातीवाद असे डाग पूर्वी जिल्ह्यावर होतेच त्यात'कोपर्डी 'प्रकरणाने जिल्ह्याच्या तोंडाला कायमचे काळे फासले आहे. भरीतभर म्हणजे छत्रपतींचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना आमच्या शहरी सुज्ञ मतदारांनी चक्क निवडून दिले आहे.
तिकडे छत्रपतींची गादी असलेल्या जिल्ह्यातील अनेक वीर वयाच्या अगदी 19-20 वर्षी कवळ्या वयात शहीद होत आहेत. त्याचा शोक व सार्थ अभिमानही वाटतो. इकडे मात्र आमच्या नगर जिल्ह्यातील पुत्र हनीट्रॅपच्या नादी लागून 7-8 वर्षांपासून शत्रूराष्ट्राला माहिती देत आहेत हेच आमचे शौर्य.
आता तर आम्ही कळसच केलाय. आता आम्ही महिलांच्या खुनाच्या सुपाऱ्याच द्यायला लागलोय.
त्यांचे खून पाडायला लागलोय.
आता कोणत्या मुखाने I ❤️ NGR म्हणावे ? आणि बाहेर जिल्ह्यात गेल्यावर अहमदनगरची महती काय सांगावी ?ज्या जिल्ह्यात साक्षात राजा रामाने वास्तव्य केले (डोंगरगण), ज्ञानेश्वरी लिहली गेली, गोरक्षनाथ, मच्छींदरनाथ यांनी वास्तव्य केले,सबका मालिक एक संदेश देणारे साई झालेत, मा. फिरोदियाजी सारखे उद्योजक दिलेत, देशाला सहकार ज्या जिल्ह्याने शिकविला त्या जिल्ह्याची इतकी दुरावस्था आता पाहवत नाही. न्यायदेवता, दंडदेवता साक्षात शनी महाराज ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात इतका आतंक का ?
तीव्र प्रतिक्रिया :-
दिपक सदाशिव पुरी,
9158115666,
माहिती प्रवाह ट्रस्ट,
तालुका - पाथर्डी, जिल्हा - ........

